Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
इमेजवर क्लिक करा

Saturday, December 3, 2022

झेंडा अमुचा समुहगीत

 झेंडा अमुचा 

झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान करितो आम्ही प्रणाम याला, 

करितो आम्ही प्रणाम ॥ धृ. ॥ 

लढले गांधी यांच्या करिता, टिळक नेहरू, लढली जनता । 

समर धुरंधर वीर खरोखर, अर्पुनि गेले प्राण ॥१॥

 भारत माता अमुची माता, आम्ही गातो या जयगीता ।

 हिमालयाच्या उंच शिरावर, फडकत राहो निशाण ॥२॥ 

या देशाची पवित्र माती, जुळली आमच्या मधली नाती 

एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान ॥३॥

 गगनावरी अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटालहरी 

जय जय भारत जय, जय भारत, जय गाताती जय गान ॥ ४ ॥ 

वि. म. कुलकर्णी

No comments:

Post a Comment