Breaking news

Sunday, October 8, 2023

भेंडी लागवड तंत्रज्ञान

भेंडी लागवड तंत्रज्ञान 

भेंडीचे आखूड, लांब, सडपातळ, जाड व वेगवेगळ्या रंगाचे शेकडो प्रकार आहे. त्यामधील लाल भेंडी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भेंडी लागवडी चे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास त्यामधून चांगले उत्पन्न मिळू शकते.


भेंडीचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे. भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध असून, त्या सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये अग्रेसर आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल हे उत्पादना मध्ये अग्रेसर राज्य आहेत. भेंडी मध्ये आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे जास्त  प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. शिवाय काही देशात भेंडीच्या झाडाचे मूळ आणि फांद्या साखर तसेच गूळ बनवण्यासाठी स्पष्टीकरण म्हणून वापर केला जातो. भेंडीच्या भाजलेल्या बिया कॉफी  बनवण्यासाठी  पर्याय म्हणून वापरल्या जातात. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते. भेंडीचा वापर कागद निर्मिती उद्योगामध्येही सुद्धा  केला जातो.


हवामान 


 भेंडी पिकाला उष्ण, दमट हवामान चांगले मानवते. २२ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते. 


भेंडीला जास्त थंडी सहन होत नसून २० अंशा पेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते.


जास्त तापमान आणि कमी आर्द्रता काळात भेंडी  पिकाची वाढ थांबते. 


४२ अंशा पेक्षा अधिक तापमानात फूल गळ वाढून उत्पादन कमी होते. 


थंडी कमी असल्यास वर्ष भरात  कधीही भेंडी ची लागवड करता येते.


दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.


जमीन 


भेंडीचे पीक हलक्‍या किंवा मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. पण  पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. 


हंगाम


भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. 


अधिक उत्पादनासाठी खरीप आणि  उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. 


उन्हाळी हंगाम - जानेवारीचा  दुसरा ते तिसरा आठवडा ते मार्च.


खरीप हंगाम-जून ते ऑगस्ट .


कोकण भागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. 


सतत पुरवठा करण्यासाठी भेंडी १५ ते २० दिवसाचे अंतर ठेवून टप्प्यात लागवड करावी.


लागवड


मशागतीमध्ये एकदा चांगली नांगरणी करावी. 


त्यानंतर २ ते ३ कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. 


हेक्टरी २५ टन सेंद्रिय खत टाकून घ्यावं. 


सरी व  वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी. 


चांगल्या वाढीसाठी व अधिक उत्पादना करिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा.


खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर ७५ ते ६० सेंमी ठेवावे. आणि उन्‍हाळ्यात ४५ सेंमी ठेवावे. 


दोन झाडांतील अंतर ३० ते ४५ सेंमी राहील, अशा हिशोबाने बी टोकावे. 


जमिनीचा पोत बघून अंतर कमी जास्त करावे. 


प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास भेंडी पिकाची  व उत्पादनामध्ये वाढ होते. 


जमिनीमध्ये ओलावा टिकवून राहतो. 


आच्छादनामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या, उत्कृष्ट प्रकारे फळ धारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.


सुधारित जाती 


परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली इत्यादी .


बियाणे प्रमाण 


उन्‍हाळ्यात हेक्टरी १० किलो, खरीप हंगामात ८ किलो बियाणे पुरेसे आहे . लागवडीचे अंतर, बियाणे उगवण क्षमता आणि हंगामानुसार बियाणे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.


खत व्यवस्थापन 


२५-३० टन चांगले कुजलेले शेणखत. 


नत्र, स्फुरद,पालाश १०० - ५० - ५० किलो प्रति हेक्टरी द्यावे . 


नत्र वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावा. 


फवारणी आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.


पाणी व्यवस्थापन 


भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी जास्त  प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असते. 


ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. 


सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत २.४ लिटर पाणी प्रति ४ झाड याप्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. 


त्यानंतर ७.६ लिटर पाणी प्रति ४ झाड या प्रमाणे गरजेचे  असते. 


एक दिवस आड ठिबकद्वारे पाणी द्यावे. 


आंतरमशागत 


गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. सरी वरंबा पद्धती  मध्ये पिकाला मातीची भर देऊन घ्यावी. 


रोग व किडी 


रोग : भुरी,केवडा, पानांवरील ठिपके, पिवळा  व्हेन मोझॅक, मर रोग इ.


कीडी : फळे पोखरणारी अळी, खोडकीड, मावा, तुडतुडे, लाल कोळी इत्यादी. 


एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन


जमिनीची खोल नांगरणी करावी.


पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापना करिता निळे तसेच पिवळ्या रंगाचे १० सापळे प्रती हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये लावावे.


रोग-कीडग्रस्त झाडे शेतातून उपटून नष्ट करावीत.


किडींच्या व्यवस्थापन करिता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.


प्रत्येक १० ओळीनंतर 1 ओळ झेंडू फुलांची लावावी. 


किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी प्रमाणात  करावा. 


काढणी


लागवडीपासून फूल लागायला ३५-४० दिवसांनी सुरुवात होते. 


त्यानंतर ५५-६५ दिवसांनी तोडणी सुरू होते. 


साधारण २-३ इंच लांब भेंडीची तोडणी करावी. 


एकदिवसाआड काळजीपूर्वक तोडणी करावी. 


तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी.


फळांची आकारा नुसार वर्गवारी करून, त्यामधील रोगट व कुरूप फळे काढून टाकावी.


भेंडीचे हेक्टरी उत्पादन १२-१५ टन मिळते.

No comments:

Post a Comment