Breaking news

Monday, September 18, 2023

खत-बियाणे तक्रार नोंदणी :

 खत-बियाणे तक्रार नोंदणी : आता बोगस खत आणि बियाण्यांची तक्रार करा मोबाईलवरून..


 खत तक्रार नोंदणी:

       नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेती विषयी वेगवेगळे योजनांविषयी माहिती बघत असतो जसे की  कुसुम सोलर पंप योजना असेल, आंबा लागवड अनुदान योजना असेल याचबरोबर मागील त्याला विहीर किंवा मागील त्याला शेततळे याविषयी विविध योजनांची माहिती आपण देतो.
       याचबरोबर शेतीसाठी लागणारी जी आधुनिक यंत्र आहेत जसे की कांदा पेरणी यंत्र, असेल मका टोकन यंत्र असेल, सोयाबीन टोकन यंत्र असेल, कांदा कापणी यंत्र असेल याचबरोबर खुरपणी यंत्र यांसारख्या नवनवीन आधुनिक यंत्र विषयी आपण माहिती बघितलेली आहे. 
शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी जे काही शेतकऱ्यांना खताच्या संबंधित किंवा बियाणांच्या संबंधित काही तक्रार असतील तर त्या व्हाट्सअप द्वारे सरकार  पर्यंत पोहोचवल्या जातील व शेतकऱ्याला मदत केली जाईल.
योजना ओडीसा सरकारच्या योजनेच्या आधारे बनवले असून शेतकऱ्याला whatts app नंबर दिला जातो ज्याद्वारे शेतकरी आपल्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचू शकते. या तक्रारी शेतकऱ्याला आपल्या पुराव्यासह दाखल करता येणार आहेत आणि तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल.
आता खरीप सीजन सुरू असल्याने शेतकरी खते व बी -बियाणे खरेदी करत असतात त्यामुळे शेतकऱ्याला खूप लूट होत असते. . तसेच विक्रेता खताचे किंवा बियाण्याचे किमती जास्त सांगून शेतकऱ्याची फसवणूक होत असत्ते. हा खत घेतला तरच तो खत मिळेल अशा प्रकारची लिंकिंग  करावी लागते. आता बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे तरी यापुढे शेतकऱ्याला काय अडचण आली किंवा बोगस  बियाणे असतील याबद्दल तक्रार तो शासनाकडे करू शकतो त्यामुळे वरील whatsapp नंबर हा राज्य शासनाद्वारे काढला गेला असून तरी त्यावर आपली तक्रार नोंदवता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीचे पुरावे तपासून योग्य ती कारवाई  खत विक्रेत्यावर केली

No comments:

Post a Comment