Breaking news

Sunday, September 17, 2023

कांदा कापणी यंत्र

कांदा कापणी यंत्र : आता चालणार बॅटरीवर | पहा किंमत आणि फायदे:

कांदा कापणी यंत्राची गरज :पूर्वीच्या काळापासून आपण पाहतोय की शेतीतील अनेक कामे  मजुरांच्या मदतीने केले जाते.
परंतु आपण आज 21 व्या शतकात जगत आहोत ज्या ठिकाणी तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे परंतु शेतकरी नवीन बदल स्वीकारण्यासाठी तयार असावे.
आज आपण पाहतो आता ऊस तोडून नेईपर्यंत सर्व कामे यंत्राद्वारे होते तसेच गहू पेरणी पासून काढणी पर्यंत सर्व कामे मशिन द्वारे केली जातात.
तसेच आज आपण पाहतो मजूर टंचाई किती प्रमाणात आहे यावर उपाय म्हणून सुद्धा कांदा कापणी यंत्र असेल तसेच कांदा पेरणी यंत्र असेल उपयुक्त आहे.
मजुरांचे मजूरी खूप वाढली आहेत यावर उपाय म्हणून हे कांदा कापणी यंत्र खूप उपयोगी आहे.


कांदा कापणी यंत्राचे वैशिष्ट्ये :
●हे यंत्र बॅटरी द्वारे चालते.
●12 व्होल्ट बॅटरी आवश्यक आहे त्यामुळे ही मशीन आपल्या फवारण्यासाठी असलेल्या पंपावर सुद्धा चालू शकते.
●या यंत्रावर बसून सुद्धा काम करू शकता.
●एका वेळी दोन व्यक्ती काम करू शकतात.
●मजूर जे हाताने काम करतात त्यापेक्षा दुप्पट गतीने काम या यंत्रावर होते.
●बसून काम करत येत असल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचा थकवा  जाणवत  नाही.
●मशीन मजबूत असून अर्ध्या इंची पाईप पासून बनवलेले आहे आणि सोबत स्टँडही दिले जाते.

आपल्याला फक्त मशीन मिळू शकते आपण त्याला फवारणी पंपांची बॅटरी वापरू शकता,याचा लाभ असा की यंत्राची किंमत कमी होते जे की शेतकऱ्याच्या नफ्याचे आहे.
या यंत्राला पाते दिलेले असतात त्यामुळे वापरताना काळजी घ्या की आपल्याला कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही , जरी जखम झाली तरी कंपनी किंवा विक्रेता जबाबदार राहणार नाही.
चार्जिंग पंपावर जवळपास 2 तास हे यंन्त्र चालू शकते. 


कांदा कापणी यंत्र
काय काळजी घ्यायची :
1. लहान मुलांपासून लांब ठेवा.
2. मशीन वापरत असताना  की ब्लेड मुळे कसलीही इजा होणार नाही एवढी काळजी घ्या.
3. मशीन वापरत असताना कांद्याच्या पातीचे तुकडे डोळ्यात उडू  नये म्हणून चष्म्याच्या वापर करा.
4. मशीन वापरत असताना ब्लेड घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असल्याची खात्री करुन घ्या.
5. आवश्यक नसल्यास मशीन बंद करा.
6. कनेकशन करत असताना लाल वायर positive ला तर काळी वायर negative ला जोडली असल्याची खात्री करा.
7. कांदाकापणी यंत्र हे इतर पिकाच्या कापणीसाठी वापरू नका.
8. यंत्रामुळे कसलीही जखम झाली तर कंपनी किंवा विक्रेता जबाबदार राहणार नाही.


कांदा कापणी यंत्राचे फायदे :
●कमी वेळात डबल काम.
कोणताही शारीरिक त्रास नाही.
●कमी किंमत
●बॅटरी वर चालणारे यंत्र.
●मजूर टंचाईला उत्तम पर्याय.

No comments:

Post a Comment