Breaking news

Tuesday, September 19, 2023

८० वर्षाचे आजोबा गाय पालनातून कमावतात लाखो रुपये : पहा यशोगाथा

 ८० वर्षाचे आजोबा गाय पालनातून कमावतात लाखो रुपये : पहा यशोगाथा

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेती विषयी अनेक योजना5T विषयी माहिती आपण आपल्या पेजवर बघत असतो त्याचबरोबर शेतीला लागणारे आधुनिक यंत्रणे असतील  जसे की कांदा कापणी यंत्र मानवचालित पेरणी यंत्र , खुरपणी यंत्र यांसारख्या विविध यंत्रांची माहिती बघितली आहे तसेच शेतकऱ्यांचे उपयोगी येणाऱ्या सरकारच्या नवनवीन योजना असतील जसे की  मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना , मागेल त्याला विहीर योजना , याचबरोबर कुसुम सोलार पंप योजना यांसारख्या योजनांची माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो.


       याचबरोबर आपण शेतकऱ्यांची यशोगाथा जसे की टोमॅटो यशोगाथा ज्यात की गायकर कुटुंब टोमॅटो शेतीतून कसे करोडपती झाले याबद्दल माहिती बघितली आहे तरी

आज आपण ऐंशी वर्षांच्या आजोबा दुग्ध व्यवसायातून लाखपती कसे झाले. याबद्दल यशोगाथा बघणार आहोत.

 दुग्ध व्यवसाय :

     शेतकरी मित्रांनो आजच्या काळात दुग्ध व्यवसायाची संख्या जास्त वाढत आहे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहेत त्यातून अनेक शेतकरी महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत अशाच एक 80 वर्षांच्या आपल्या सोळा गाईच्या मदतीने लाखो रुपये कसे कमवतात याबद्दल सविस्तर माहिती बघूया.

 कोण आहेत ते आजोबा : 

 शेतकरी मित्रांनो आजोबांचे नाव आहे  गोरे

बाबा.गोरे बाबा यांचे वय ऐंशी वर्ष असून ते सोळा गायांचे पालन करतात आणि त्यातून भरघोस उत्पन्न घेतात.  बाबा गोरे शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात आणि ते जर 80 वर्षाचे असले तर असली तरी वयावर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले. आजोबा मागील १० वर्षापासून दुग्ध व्यवसायात आहेत.


किती किती गायींपासून सुरुवात केली व किती किती जमीन आहे ?

या आजोबांनी सुरुवातीला 4 ते 5 घरापासून सुरुवात केली होती हळूहळू ते गायी वाढवत गेले आणि आता सध्याला 16 जर्सी गाई आहेत. आजोबांकडे केवळ 3 एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील चारा त्यांना पुरत नाही त्यामुळे ते बाहेरुन विकत घेतात. आजोबांचे दिवसाला एकूण 100 लिटर दूध डेअरीला जाते. महत्त्वाचं म्हणजे आजोबा पहिल्यांदा विहिरी , नाले खोदण्यासाठी बाहेर कामात जात होते पण आता दुग्ध व्यवसायामुळे वित्तीय परिस्थिती चांगली झाली आहे. सुरुवातीला विहिरी खोदण्यासाठी जात असताना त्यांना पंधरा-सोळा रुपये वेतन मिळत होता.अतिशय महत्वाचं म्हणजे जनावरांची पोटभर चारा आणि पाणी वेळेवर देतात त्यामुळे दूध वाढीस मदत होत असते. आजोबा शेणखता पासुनही  पैसे कमवतात दहा पंधरा दिवसात दोन ट्रॉली शेणखत निघते जे की जवळपास दहा-बारा हजार रुपये एवढे आहे.

    आजोबा महिन्याला दुधातून जवळपास 1 लाख रुपये मिळवतात त्यांच्या कामात त्यांची पत्नी त्याचबरोबर मुलगा आणि सूनही मदत करते.

https://www.epranali.com


Whatts app ग्रुप जॉइन करा


No comments:

Post a Comment