रेशीम काय आहे?
या बद्दल कुणाला काहीच माहिती नाही? रेशीम चे कपडे, रेशीम धागे, रेशीम चा रूमाल तर खूपच प्रसिद्ध आहे, खूप वर्षापासून रेशीम ने आपली एक आगळवेगळी ओळख बनवली आहे. रेशीम पासून तयार होणाऱ्या सिल्क च्या साड्या तर खूप प्रसिद्ध आहेत.
म्हणून आज सुध्दा रेशीम च्या कापडाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ही मागणी दिवसेदिवस वाढत आहे. खूप महिला आहेत, ज्या सिल्क साडी आवडी ने घालतात. रेशमाच्या धाग्याला बाजारात खूप मोठ्या प्रमणात मागणी आहे. आणि हे मागणी दरवर्षी वाढत चालली आहे.रेशीम शेती मुळे खूप लोकांना रोजगार मिळाला आहे या उद्योगामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरान कडे होणारे मजुरांचे स्थलांतर कमी झाले आहे. तुती लागवड करून शेतकऱ्यांनी निसर्गाचे रक्षण सुद्धा केले आहे. काही कास्टकर शेतकरी अतिशय छोट्या व कमी अर्थसह्यात या उद्योग धंद्यात यशस्वी झाले आहेत व पैसा कमावला आहे
रेशीम उद्योग म्हणजे काय..?
रेशीम उद्योग हा प्रचंड मोठा वित्तीय उलाढाल असलेल्या उद्योग आहे. या उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाकडून देखील मदतीच्या माध्यमातुन मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रेशीम उद्योग मार्गदर्शन सेंटर उभारले आहेत. या सेंटरमधून रेशीम आळ्यांचे अंडी पुंजे तसेच मार्गदर्शन देखील मिळते. व शासन या उद्योगाला आर्थिक स्वरूपात अनुदान सुद्धा देत असते.
रेशीम उद्योगधंदा हा एक असा आधुनिक व्यवसाय आहे, जो कमीत कमी भांडवलात मध्ये सुरू केला जावू शकतो. कमी पैसे म्हणजे तुम्ही जेवढे कमी समजताय तेवढे नाही हा उद्योग सुरू करण्यासाठी कमीत कमीत आपल्याला पाच लाख रुपये गुंतवणूक लागते.
हा व्यवसाय खूप कष्ट मेहनत आणि हुशारीने करावा लागतो कारण या मध्ये खूप प्रकारच्या बाबी आहेत ज्या आपल्यासाठी नवीन आहेत.
या व्यवसाया मध्ये तुम्हाला रेशीमाचा आळ्या पाळून त्यांच्या पासून रेशीम चे उत्पनन घ्यावे लागते, या व्यवसाय मधून तुम्ही तयार झालेले रेशीम विकून चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय करण्याकरिता तुमच्याकडे शेत जमीन असणे गरजेचे आहे कारण हा व्यवसाय शेती वर निर्धारित व्यवसाय आहे.
No comments:
Post a Comment