Breaking news

Wednesday, September 13, 2023

सुकन्या समृद्धी योजना 2023| सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

 सुकन्या समृद्धी योजना 2023| सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

      भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही बचत योजना आहे. या योजनेमधुन लाभ मिळविण्यासाठी, मुलगी दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी हे खाते उघडणे गरजेचे आहे. या खात्यात किमान गुंतवणूक मर्यादा 250 रुपये आणि कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. खात्यात ही गुंतवणूक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येते. या योजनेद्वारे, गुंतवणुकीवर सरकारकडून 7.6% दराने व्याज दिले जाईल. तसेच या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर टैक्स वर सूटही देखील दिली जाईल. केंद्र सरकारने सुरू केलेली ही लघु बचत योजना आहे. देशात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे.


सुकन्या योजना पोस्ट ऑफिस

समृद्धी योजनेंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर 7.6% व्याज दिले जाते. या योजनेंतर्गत व्याज मोजण्याची पद्धत सरकारने ठरवून  दिली आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, पाच व्या दिवशी आणि महिना बंद होण्याच्या दरम्यान खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाते. सरकारकडून दरवर्षी व्याजदरात बदल देखील केले जातात आणि वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात जमा केली जाते. 



सुकन्या समृद्धी योजना 2022 चे उद्दिष्ट

या योजनेचा हेतू मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणे आणि लग्नासाठी पात्र असल्यास पैशांची कमतरता भासू नये हा आहे. बँकेत कमीत कमी 250 रुपयांमध्ये खाते उघडता येईल. या SSY 2022 द्वारे , देशातील मुलींना प्रोत्साहन मिळून त्या पुढे जाण्यास सक्षम होतील.या योजनेच्या माध्यमातून मुलींची गर्भात मारले जाण्याची क्रिया थांबवली जाईल.

सुकन्या समृद्धी योजना पात्रता



मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकाकडून मुलीच्या नावावर खाते उघडता येते.


योजनेच्या नियमांतर्गत ठेवीदार मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडू आणि चालवू शकतो.



मुलीच्या स्वाभाविक किंवा कायदेशीर पालकाला फक्त दोन मुलींसाठी खाते उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जुळ्या मुलीचा दुसरा जन्म झाल्यास किंवा पहिल्या जन्मातच तीन मुलींचा जन्म झाल्यास मुलीच्या नावावर तिसरे खाते उघडले जाऊ शकते.


सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचा फॉर्म


मुलीचे जन्म प्रमाणपत्र

ओळख पुरावा

रहिवासी पुरावा 


सुकन्या समृद्धी योजना खाते कोठे उघडले जाईल?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्टात  किंवा Bank शाखेच्या कोणत्याही अधिकृत शाखेत खाते उघडता येते. 


हे खाते किती काळ सुरू राहील?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर, ती मुलगी एकवीस वर्षांची होईपर्यंत किंवा अठरा वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत सुरू ठेवता येते


सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत सुकन्या समृद्धी योजना खाते कसे उघडायचे?

मुलीच्या जन्मापासून 10 वर्षापूर्वी 250 रुपयांच्या ठेवीसह उघडले जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, तुम्ही प्रत्येक वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सध्या त्यावर 7.6% व्याजदर मिळत आहे. या योजनेत कोणतीही व्यक्ती आपल्या 2 मुलींसाठी हे खाते उघडू शकतो. त्यांच्या वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत 9 वर्षे 4 महिन्यांत ठेवलेली रक्कम दुप्पट होईल


समृद्धी योजना वैशिष्ट्य

8.5% आकर्षक व्याजदर. व्याजदर वेळोवेळी वित्त मंत्रालयाद्वारे नियंत्रित केला जातो.


किमान रु. 1,000 ची गुंतवणूक करता येईल.

एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.

खाते उघडण्याच्या तारखेपासून चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

खाते उघडल्याच्या तारखेपासून एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर खाते परिपूर्ण होईल, या अटीच्या अधीन राहून जर खातेदाराने एकवीस वर्षांचा हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी विवाह केला असेल, तर त्या तारखेच्या पुढे खाते चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही

.












No comments:

Post a Comment